श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विष्णू इथापे यांची निवड भाजपच्या कार्यकारिणी सदश्य म्हणून निवड करण्यात आल्याने त्याचेवर परिसरातून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे
समाजहिताचा वसा घेऊन सर्व सामान्य नागरिकांसाठी आहोरात्र उभे राहणारे तसेच त्यांच्याकडे असलेले कुशल संघटन नेतृत्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्याचे माजी मंत्रीं विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या आदेशाने भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विष्णू इथापे यांची निवड भाजपच्या कार्यकारिणी सदश्य म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र माऊली निवास्थान या ठिकाणी देण्यात आले त्यांच्या निवडीनंतर तालुक्यातून त्यांचेवर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता