पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल ः प्रकाश आंबेडकर

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
पंढरपूर : लोकांनी गर्दी केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होतो, हा समज चुकीचा आहे. केवळ मोबाईलसारख्या माध्यमांमुळे कोरोनाविषयीची भीती वाढली आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वॅब घेतला तरी ते पॉझिटिव्ह येतील. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झालेली नसेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते सोमवारी पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी गर्दी झाल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतो, हा दावा फेटाळून लावला. घाऊक बाजारात दररोज व्यापार्‍यांची गर्दी होते. यापैकी किती टक्के लोकांना कोरोना झाला हे सांगा. तसेच राज्यात एसटी सेवा सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 21 लाख लोकांनी प्रवास केला आहे. सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध घातल्याचे सांगते. पण लॉकडाऊनमध्ये शहरातील लाखो लोक पायी चालत आपल्या गावी गेले. त्यामुळे गावांमध्येही कोरोनाचा प्रसार झाला. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 85 टक्के लोक कोरोनातून बरे झाले असतील तर भिण्याचे काय कारण आहे?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here