प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
देशाचे माजी राष्ट्रपती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील लष्कर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर मेंदूत रक्ताच्या गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष होते. त्यातच त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःला आयोसोलेट करून घ्यावे, असे ट्विट केले होते.
त्यांच्यावर दिल्लीतील लष्कर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराला त्यांच्या प्रकृतीने प्रतिसाद दिला नाही. आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकारण तसेच सामाजिक नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले आहे.