Ahmadnagar : आज तब्बल ७०० रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

0
जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ८७६ रुग्ण बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२५ टक्के
आज नव्या ४२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३०४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०७, अँटीजेन चाचणीत ६५ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११२, संगमनेर ०४, राहाता ०२, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर ०१, नेवासा ०१, पारनेर ०१, अकोले २१, राहुरी १७, कोपरगाव ०३, जामखेड १२, कर्जत ०३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ६५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, राहाता ०१ ,श्रीरामपुर ०३, कॅंटोन्मेंट १०, नेवासा २१, पारनेर ०४, अकोले ०३, कोपरगाव ०७ आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५०, संगमनेर २६, राहाता १२, पाथर्डी ०१,  नगर ग्रामीण १३, श्रीरामपुर १२,  कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०९, अकोले ०४,  राहुरी ०६, शेवगाव ०२,  कोपरगांव ०६, जामखेड ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७०० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २९७, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी २४, नगर ग्रा.५०, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा १४, श्रीगोंदा ३२, पारनेर १६, अकोले ३२, राहुरी ११, शेवगाव ०५,  कोपरगाव ४९, जामखेड ५१, कर्जत ०४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १७८७६*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३३०४*
*मृत्यू: २९२*
*एकूण रूग्ण संख्या:२१४७२*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here