प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
शेतकऱ्यांनी अनावश्यक खर्च टाळून सेंद्रिय पद्धतीने बनवलेले औषधे वापरावीत आणि विविध सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कृषी अभ्यासक ज्ञानेश्वर बढे यांनी केले.
बीड येथील के एस के कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ज्ञानेश्वर बढे हा ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत आहे. या कृषीदूताने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच निंबोळी अर्क , गांडूळ खत, कंपोस्ट बनवणे, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण, बीजप्रक्रिया व त्याचे फायदे, बियाणे उगवन चाचणी, चारा उपचार, वृक्षलागवड विविध अॅप्स मार्फत पिकांचे नियोजन, सुधारित जलसिंचन, सापळ्यामार्फत कीटकांची देखरेख यासारखे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृतीतून दाखवत आहे.
या विद्यार्थ्याला के. एस. के कृषी महाविद्यालयाचे सचिव डॉ.जी.वी.साळुंके, प्राचार्य डॉ.डी.ए. शिंदे व इतर प्राध्यापक वर्ग यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर यांनी दिलेल्या या मौल्यवान माहितीबद्दल ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व त्याचे आभार आणि कौतुक केले.