प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
भारताच्या स्टार टेनिस खेळाडू सुमित नागल याने युएस ओपन टेनिस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळविला. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. याआधी, सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला होता. (Sumit Nagal becomes first Indian to win a match at the US Open in 7 years)
यूएसचा प्रतिस्पर्धी ब्रॅडले क्लान याला मंगळवार 1 सप्टेंबर रोजी पराभवाची धूळ चारत नागलने यूएस ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला. 6-1, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये सुमित नागलने विजय मिळवला. अवघ्या 23 वर्षांचा सुमित गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीतील मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
नागलने क्लानविरुद्ध सामन्याच्या सुरुवातीच्या दोन सेटमध्ये 6-1, 6-3 असा धमाकेदार विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये, क्लानने नागलवर मात केली आणि सामना उत्कंठावर्धक स्थितीत आला. त्यानंतर सुमितने पुन्हा चौथ्या सेटमध्ये बाजी मारत 6-1 अशी आघाडी मिळवली.
जागतिक क्रमवारीत 122 व्या क्रमांकावर असलेल्या नागलचा यूएस ओपनच्या दुसर्या फेरीत पुढचा सामना ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम किंवा स्पेनच्या जौम मुनारशी होईल.
tadalafil 20 – tadalafil online pharmacy buy tadalafil online overnight shipping