एकनाथ खडसे संतापले, नाव न घेता फडणवीसांना टोले, म्हणाले…

    0

    प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

    एकनाथ खडसे यांनी पुन्हा संताप व्यक्त करीत आपल्याच पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला. म्हणाले पक्षात दहा पंधरा वर्षांपूर्वी आलेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. ‘राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार असल्याचं म्हणत खडसे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीसांना टोला लगावला.

    खडसे यांनी नुकताच आपला 68 वा वाढदिवस साजरा केला.  या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला. खडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी मोठी मेहनत घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती.  आता केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असं खडसे म्हणाले.

    माझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आज ना उद्या विस्फोट होणार

    मी गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. राज्यातील अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलो, त्या पक्षाला सोडून जावं असा कधीही मनात विचार आला नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here