राहुल गांधींचा हल्लाबोल विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘मोदी मेड डिझास्टर’ म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
राहुल गांधी यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संकटांमुळे देश अडचणीत असल्याचं म्हटलं आहे. या सोबत सहा मुद्दे सांगितले आहेत. 23.9 टक्क्यांनी घटलेला जीडीपीचा दर, 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, 12 कोटी लोकांच्या नोकर्या गेल्या, केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि मृत्यूमध्ये दररोज होणारी वाढ आणि भारताच्या सीमावर शेजारचा देश करत असलेली घुसखोरी या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे.
केंद्रीय मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहिचे आकडे जाहीर केले आहेत. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे.
tadalafil cheap tadalafil – liquid tadalafil online tadalafil