Beed : जिल्ह्यातील सर्व भाजीपाला मार्केट व घाऊक आडत ‘या’ वेळेत राहणार सुरू

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जिल्ह्यातील सर्व भाजीपाला मार्केट, भाजीपाल्याची घाऊक आडत सकाळी 7 ते सायंकाळी 6:30  वाजेपर्यंत या वेळेत चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु सदरील ठिकाणी कोविड विषयक नियमांचे पालन करण्यात यावे. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास सदरील आदेश रद्द करण्यात येतील असे निर्देश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रवीण धरमकर यांनी दिले आहेत.
या आदेशाचे अवज्ञा करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने आर्थिक दंड संहिता 1860 (45) यांच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि इतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार Covid-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दि.30 सप्टेंबर,2020 रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144(1)(3) तीन रात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here