राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील एकमेव तलाव वाबोंरी चारीच्या लाईनवर आहे. टेलच्या भागात तलाव असल्याने आजपर्यंत वांबोरी चारीचे फक्त ७-८ दिवसच पाणी तलावात आले आहे. तसेच मुळा धरण पातळीत दिवसेंदिवस वाढ होत असून धरण पूर्णपणे भरणार असून धरणाचे पाणी वाबोंरी चारीच्या माध्यमातून तलावात सोडण्यात यावे.
चारीमुळे मढीचा तलाव भरल्यास परिसरातील गावांना त्याच्या फायदा होतो. अशा मागणीचे पञ कानिफनाथ देवस्थान ट्स्टचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शिवशंकर राजळे, पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड यांनी उर्जा राज्यमंञी, नगरविकास, उच्च तंञ शिक्षण मंञी मा.ना.आ.प्राजक्त दादा तनपुरे यांना दिले आहे.