प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी श्रीगोंदा नगरपालिकेने शहरातून घराघरात बसविलेल्या गणेश मूर्ती सजविलेल्या ट्रॅकटरमध्ये आणून शहरातील पंचायत समिती वसाहतीमधील विहिरीत विसर्जन केले यास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
मंगळवारी विसर्जन दिवशी प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गटनेते मनोहर पोटे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, नगरसेवक सतिश मखरे, प्रशांत गोरे, संतोष खेतमाळीस यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.
नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे,गटनेते मनोहर पोटे,मुख्याधिकारी देवरे,पालिका प्रशासनाने यासाठी ३दिवस शहरात आवाहन केले होते तर तहसीलदार पवार,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी शहर तसेच तालुक्यात एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडली त्यासही प्रतिसाद मिळाला
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले कोरोना संकटात शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास प्रतिसाद दिला.
मनोहर पोटे म्हणाले शहरात एक गाव एक गणपतीची संकल्पना बाबासाहेब भोस यांनी मांडली शहरात एकच ठिकाणी गणपती बसविण्याचा निर्णय झाला.
घराघरात बसविण्यात आलेल्या गणेशाचे विसर्जन साठी नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी पालिकेने शहरातून गणेश मूर्ती घेऊन विसर्जन करण्याचा निर्णय घेतला त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.
tadalafil price – buy tadalafil online safely buy tadalafil generic