Shevgaon :  पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान 

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – कोरोना महामारी काळात शेवगाव तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मंदार जवळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सामान्य नागरिकांना सुरक्षा देण्याचे काम जवळे साहेब यांनी केले आहे, असे मत सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे चांद शेख यांनी मांडले. कोरोना योद्धा म्हणून जवळे साहेब यांचा सन्मान करताना चांद शेख बोलत होते.
कोरोना जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग संकटात असताना या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, पोलीस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, पत्रकार हे करत असलेले कार्य निश्तीत गौरवशाली आहे. याच गौरवात भर टाकण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी मंदार जवळे साहेब करत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात शेवगाव तालुक्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या उपविभागीय कार्यालयातील इतर पोलीस कॉन्स्टबल सह महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये विविध ठिकाणी छापे मारून अवैध धंदे त्यांनी बंद केले. कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याचे काम शेवगाव तालुक्यातील सर्वं पोलीस अधिकारी करत आहे. शेवगाव तालुक्यातील उपविभागीय पोलिस कार्यालय शेवगाव येथील कार्य वाखण्याजोगे आहे.
कित्येक गुन्ह्याचा तपास त्यांनी लावला विशेष बाब म्हणजे गुन्हा घडण्या अगोदर विविध ठिकाणी सापळा रचून गुन्हेगार त्यांनी वेळीच पकडले त्यामुळे पुढे या गुन्हेगारी वृत्तीच्या गुन्हेगाराकडून पुढे होणारे संभाव्य धोके टाळण्यास मंदार जवळे व त्यांची टीमला यश आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतः च्या जीवाला धोका आहे. याची जाणीव असतानाही शेवगाव तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रात्रंदिवस आपल्या सहकाऱ्यांसोबत सेवा दिली. त्यांच्या या कामाची दखल सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे घेऊन सावली संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांचे हस्ते कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मंदार जवळे साहेब यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सावली दिव्यांग संस्थेचे वतीने कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानित कण्यात आले.

तसेच गुप्तचर विभागाचे राजू चव्हाण साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पो.हे.कॉ.नितीन दराडे, पो.हे.कॉ.संजय बडे, पो.कॉ.ज्ञानेश्वर इलग, पो.कॉ.सागर बुधवंत, पो.कॉ.संदीप बर्डे, पो.कॉ.सुभाष टिळे, म.पो.कॉ.अरुणा मुंगसे मॅडम, म.पो.कॉ.रोहिणी घरवाढवे मॅडम यांच्या देखील यावेळी प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे कार्य जिल्ह्यात अतिशय चांगले असून संस्थेच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळत असून सर्व दिव्यांग बांधवांनी संस्थेच्या पाठीशी उभे रहावे, असे मत जवळे साहेब यांनी व्यक्त केले.
यावेळी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चाँद शेख, सचिव नवनाथ औटी, सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव शहर अध्यक्ष गणेश महाजन, उपाध्यक्ष सुनील वाळके, कार्याध्यक्ष विठ्ठल दहिवाळकर उपस्थित होते.
सावली दिव्यांग संघटनेचे संभाजी गुठे, मनोहर मराठे, खलील शेख, अशोक कुसळकर, भाऊसाहेब गव्हाणे, बाहुबली वायकर, एकनाथ धाने, भरत साळुंके, राधाकिसन चेमटे, सीताराम सांगळे, महबूब सय्यद, बाबासाहेब गडाख, अतिष अंगरख, नंदकिशोर चिंतामणी, सावळीराम काळे, ताराचंद पिवळ, दत्तात्रय घोरतळे, शिवप्रसाद काळे, गोविंद बाहेती, निलोफर शेख, सोनाली चेडे, सुवर्णा देशमुख, सकू मिसाळ, वंदना तुजारे, संजीवनी आदमाने, चंद्रकला चव्हाण, भीमाबाई बडे, फरीदा शेख, मीरा औटी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही सोशल मिडीया, प्रिन्ट मीडिया यांच्या माध्यमातून अनेकांचे कोव्हिड काळातील कार्य पाहत या कोव्हिड योद्ध्यांचे मनोबल वाढवणे व त्यांचे कौतुक करणे हे आमचेही कर्तव्य आहे हा उद्देश ठेवूनच आम्ही ख-या कोव्हिड योध्दांचा सन्मान करत आहोत. 
– बाबासाहेब महापुरे, अध्यक्ष – सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here