प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
पोलिसांनी शहरातील खाटीक गल्ली येथे सुरू असलेल्या कत्तल खान्यावर छापा टाकून त्याठिकाणाहून 500 किलो वजनाचे 75 हजार रुपये किंमतीचे गोमांस, 10हजार रुपये किंमतीची एक गाय, 4लाख रु किंमतीचा एक टेम्पो क्र एम एच 16 ए वाय 8885, असा एकूण 4लाख 85 हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल संतोष कोपनर यांच्या फिर्यादीवरून 1)सद्दाम आबेद कुरेशी 2)उजेफ अल्ताफ सौदागर 3)वसीम रफीक कुरेशी 4)अतीक गुलाम हुसैन 5) मुनाफ गुलाम हुसैन कुुरेशी सर्व रा. खाटीक गल्ली, श्रीगोंदा, यांच्याविरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, संतोष कोपनर यांनी केली आहे.