प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर कंगना सोशल मीडियावर खूप अॅव्टिव्ह झाली आहे. कंगनाच्या ट्विटमुळे ती सतत चर्चेत आहे. कंगनाच्या ट्विटबाबत काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगना व तिच्या टीमचा बोलविता धनी भाजप असल्याचे म्हटले आहे. कंगना व तिची टीम म्हणजे भाजप आयटी सेलचाच एक भाग आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सचिन सावंत यांनी कंगना राणावत बाबत त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. कंगना टीम + भाजप आयटी सेल. तसेच त्यांनी कंगनाला ट्विटरमध्ये कृतघ्न म्हटले आहे.
वाचा -ट्विट
.@KanganaTeam म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने @ramkadam यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व #आमचीमुंबई वर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020