प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याच्या धमकीचा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाला. या मेलमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षे बाबत यंत्रणा हाय-अलर्ट झाली आहे.
या ईमेल मध्ये Kill Narendra Modi एवढे तीनच शब्द लिहिले आहेत. मेल मिळाल्यानंतर तातडीने ही माहिती एनआयएने गृहमंत्रालयाला कळविली आहे. आठ ऑगस्ट रोजी हा मेल एनआयएला मिळाला होता. गृहमंत्रालयाला मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान यांची सुरक्षा करणा-या एसपीजी ला अलर्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी मोदी यांचे ट्विटर अकाउंट देखील हॅक करण्यात आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हॅकर्सने बिटकॉईनची मागणी केली होती. तसेच प्रधानमंत्री रिलिफ फंडमध्ये देणगी देण्याचे ट्टविट करण्यात आले होते. तब्बल अर्धा डझन ट्विट हॅकींग नंतर करण्यात आले. काही काळाने हे अकाउंट पूर्ववत करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी लखनौ येथून एका माणसाने 112 नंबरवर फोन करून एका तासात नरेंद्र मोदी यांना गोळ्या घालून संपवू अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत या माणसाला पकडले होते. हरभजन सिंह असे त्याचे नाव असून तो नशेत होता असे पोलिसांनी सांगितले होते.
एकूणच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेला धोका असल्याचं बोललं जातय. या सर्व प्रकरणानंतर मोदी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून एसपीजी हाय अलर्ट झाली आहे.