प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्य यांचा कार्यकाळ पुढील दोन महिन्यात संपणार असून या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोरोनाच्या महामारीमुळे निवडणुकांवर बंधने घालण्यात आली आहेत. काही संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तर ग्रामपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्वाच्या घटक असणाऱ्या संस्थेवर प्रशासक नेमण्याबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत.
प्रशासक नेमणुकीच्या निर्णयानंतर तालुक्यात आपल्या गटाच्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले होते मात्र शासकीय अधिकारीच प्रशासक म्हणून काम पाहणार असल्याने कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ५९ ग्रामपंचायतची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याबाबत पंचायत समिती स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत, कृषी) शाखा अभियंता, केंद्रप्रमुख, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व पंचायत समितीअंतर्गत येणारे इतर विभागांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत प्रशासक पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
कोणत्या ग्रामपंचायतची कधी मुदत संपणार
अजनुज, आर्वी- अनगारे, आढळगाव, उकडगाव, उक्खलगाव, एरंडोली,( १० सप्टेंबर) कामठी, कोथुळ, कोंडेगव्हाण, कोसगव्हाण कोरेगाव, कोरेगव्हाण, (११सप्टेंबर) कौठा,( ९सप्टेंबर) खांडगाव, (११ सप्टेंबर) गव्हाणेवाडी ( ३० ऑक्टोबर),
गार, (१० सप्टेंबर) घुगलवडगाव, घोडेगाव ( ११ सप्टेंबर) घोटवी, चांडगाव, (१० सप्टेंबर) चांभुर्डी, (११ सप्टेंबर) चिखली ( १२ऑक्टोबर), चिखलठाणवाडी,(१०सप्टेंबर), चिंभळा(११सप्टेंबर),, चोराचीवाडी( १२ सप्टेंबर), टाकळी कडेवळीत (११ सप्टेंबर) , ढवळगाव, ढोरजा,(१० सप्टेंबर), देऊळगाव(२५ ऑक्टोबर), , निंबवी,(११सप्टेंबर) ,निमगाव खलू, (११ सप्टेंबर), पिंपरी कोलदंर( ११सप्टेंबर), पिसोरे खांड, बाबूर्डी,( १० सप्टेंबर), बांगर्डे,( १५ ऑक्टोबर), बेलवंडी कोठार, बोरी,९ सप्टेंबर), भानगाव, म्हातारपिंपरी ( १० सप्टेंबर), म्हसे ( ११ सप्टेंबर), मुंगूसगाव (१०सप्टेंबर),, येवती,(११सप्टेंबर), येळपणे (८सप्टेंबर), राजापूर (११सप्टेंबर) रायगव्हाण, (१२सप्टेंबर),रुईखेल, वडाळी, (११सप्टेंबर ), लिंपणगाव (१ ०सप्टेंबर) वांगदरी,(११ सप्टेंबर), वेळू,(१०सप्टेंबर), शिरसगाव बोडखा,(१२सप्टेंबर ), शेडगाव,(१०सप्टेंबर), सांगवी दुमाला,( ११सप्टेंबर), सारोळा सोमवंशी,( ११सप्टेंबर), सुरेगाव(१०सप्टेंबर), सुरोडी,(३ सप्टेंबर), हंगेवाडी,(११सप्टेंबर), हिंगणी दुमाला,( ३० 9ऑक्टोबर) हिरडगाव ( १० सप्टेंबर)
एका प्रशासकाकडे तीन ग्रामपंचायतचा कारभारगटविकास अधिकारी प्रशांत काळे म्हणाले, पुढील दोन महिन्यात ५९ ग्रामपंचायतिची मुदत संपत आहे. त्याठिकाणी प्रशासक नेमण्याबाबत हालचाली सुरू आहेत.ग्रामपंचायतीची संख्या आणि उपलब्ध अधिकारी यांची संख्या लक्षात घेऊन एका प्रशासकाकडे तीन ग्रामपंचायतीचा कारभार देण्याबाबत विचार सुरू आहे.१५ व्या वित्त आयोगाचा निधी होणार खर्चज्या ग्रामपंचायतची मुदत संपत आहे त्या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाला आहे.या प्रशासकामार्फतच या निधीचा विनियोग केला जाणार असल्याने ही कामे दर्जेदार होतील अशी आशा करायला हरकत नाही.