प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर ट्विटरच्या माध्यामातून मुंबई पोलिस व मुंबईवर टीका केल्यानंतर सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी अनेकांनी कंगनाचा समाचार घेतला. सुरुवातील कंगना राणावतने मुंबईला पाक व्याप्त काश्मीर ठरवले. त्यावर कंगनाचा निषेध केला गेला. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनाला पाकव्याप्त काश्मीर मध्ये शुटिंगसाठी पाठवावे असे वक्तव्य केले तर गृहमंत्री देशमुख यांनी कंगनाला थेट मुंबई न येण्याचा सल्ला दिला. भाजपने मात्र कंगनाची पाठराखण केली.
यावर कंगना भडकली आतातर मी 9 सप्टेंबरला मुंबईत येणारच कोणाची हिंमत असेल तर रोखून दाखवा. असे थेट आव्हान दिले. त्यावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या रणरागिनी कंगनाचे थोबाड फोडतील, असा इशारा दिला.
या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सरनाईक यांना अटक करण्याची मागणी केली. यावर भाजपने हा राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरुन माझ्या अटकेचा डाव रचला आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. असे म्हटल्याने हे प्रकरण अधिकाधिक चिघळले जात आहे.
एकूणच अभिनेत्री कंगना राणावत हिने सुशांच्या मृत्यूनंतर सर्व फोकस स्वतःकडे कसा राहील याकडे लक्ष दिले. तर शिवसेना भाजप सर्वच जण यावर राजकारण करण्यात गुंतले आहेत, पाहुया कंगना मुंबईत आल्यावर काय होते?