Shrirampur : आमदार लहू कानडे यांच्यावर गुन्हा दाखल करा; भाजपची मागणी 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीरामपूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला दरवाढ मिळावी म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजपा पदाधिकार्‍यांवर व दूध उत्पादक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणाऱ्या आमदारांनीच कायदा-सुव्यवस्थेचा भंग केला आहे. श्रीरामपूरच्या बेजबाबदार लोक प्रतिनिधीच्या हस्ते कोव्हिड सेंटरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने गटई कामगारांच्या टपऱ्यांचे वाटप आले. सोशल डिस्ट्न्सिंगचे पालन केले गेले नाही. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधीच्या समवेत, व त्यांचे सहकारी बरोबरच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह ५३ लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोव्हीड १९ च्या काळात राज्यात कलम१४४ लागू असताना कायद्याचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे गर्दी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करावा. गावामध्ये विना मास्क फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्सिगचे पालन न करणाऱ्या नागरिकावर अनेक गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन सोशल डिस्टन्सिगचे कोणत्याही प्रकारचे नियम न पाळणे तसेच कोव्हीड सेंटर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या असताना देखील सेंटरच्या लगत हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातून 53 लाभार्थी आपल्या वाहनासह उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी वाटप करण्यात येण्याऱ्या टपऱ्याचे सुट्टे भाग हे कोव्हीड सेंटरमधील आवरामध्ये ठेवण्यात आले होते. तेथूनच त्यातील एक टपरी कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. त्यामुळे शासकीय अधिकारी पदाधिकाऱ्याना जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेण्यास भाग पाडत असतील तर या बेजबाबदार व निष्क्रिय आमदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी श्रीरामपूर भाजपा तालुका अध्यक्ष सुनिल वाणी, अशोकचे संचालक बबन मुठे, भाजपा शहर संघटन सरचिटणीस सतिश सौदागर, विशाल अंभोरे, विशाल यादव, आदीनी यांना दिलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर अनिल भनगडे, रामभाऊ तरस, प्रफुल्ल डावरे, सुनिल दिवटे, संतोष हरगुडे, मुकुंद हापसे, महेश खरात, मुकुंद लबडे, विजय लांडे,अक्षय वर्पे, रुपेश हरकल,विशाल गायधने, आण्णा भालेराव, रवी कनगरे बाळासाहेब आहिरे,अरुण शिंदे, सुहास पंडित,अमोल मावस,बापू वडीतके,सुदाम बढे,अक्षय कावरे,आदेश मोरे,रोहित मुसमाडे,पुरुषोत्तम भराटे , अविनाश काळे, मच्छिंद्र हिंगमीरे, पंकज करमासे, गणेश कांबळे,आदीसह  पदाधिकाऱ्याच्या या निवेदनाात सह्या आहे.

या निवेदनाची संबंधित अधिकाऱ्यानी दखल न घेतल्यास भाजपाचे शिष्टमंडळ विरोधीपक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here