प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील ड्रग्ज केसचा तपास एनसीबी करीत आहे. काल रात्री 10 च्या सुमारास रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती व सॅम्यूअल मिरांडा दोघांना एनसीबीने अटक केली. त्यानंतर आज एनसीबीच्या टीमनं सकाळी रियाच्या घरी जाऊन रियाला समन्स बजावला आहे. आज रिया चक्रवर्तीला सकाळी 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी NCB कार्यालयात जावं लागणार आहे.
सुशांत आत्महत्येच्या तपासात ड्रग्जचा अँगल समोर आल्याने प्रकरणाला वेगळेच वळण लागले. याचे धागेदोरे रिया चक्रवर्तीशी जुळतात का हे तपासत असताना रियाच्या भावाला काल अटक झाली. याप्रक्रणी रियाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
tadalafil 20 mg – tadalafil generic buy tadalafil 20mg price