प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कनविनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी अॅपलॉक, पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सेपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्स अशा अॅप्सचा समावेश आहे. असे अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ती तात्काळ अनइन्स्टॉल करा, अशा सूचना सायबर तज्ञांनी दिल्या आहेत.
या अॅप्स मुळे तुमच्या मोबाईलमध्ये वायरस आणि मालवेअर घुसून ते तुमच्या बँकेची माहिती चोरीत आहेत. तसेच ऑटो सस्क्राईब झाल्याने तुमच्या खात्यातून पैसे डिलिट होण्याची शक्यता आहे. सायबर तज्ज्ञांनी असे बरेच अॅप्स शोधले आहेत.
दरम्यान गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप्स हटविण्यात आले आहेत. मात्र, अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल आहेत.
त्यामुळे हे अॅप्स असतील तर तातडीने अनइन्स्टॉल करा अन्यथा तुमचा डेटा चोरी होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.