आज नवीन 49 नवीन बाधित रुग्ण…
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
संगमनेरमध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसागणिक वेगाने वाढत आहे. आज नवीन 49 रुग्णांचा अहवाल आल्याने बाधित रुग्ण संख्येने ओलांडले 25 वे शतक त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 2516 वर जाऊन पोहचली आहे. या रुग्ण संख्येत 9 रुग्ण हे शहरातील व 40 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता ग्रामीण भागात अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
संगमनेरमध्ये शासकीय व खासगी प्रयोग शाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज शहरातील मेनरोड 75 वर्षीय महिला, मोमिनपुरा 40 वर्षीय तरुण, इंदिरानगर 18 वर्षीय तरुण, अभंगमळा 38 वर्षीय तरुण, विद्यानगर 55 वर्षीय महिला, 50 वर्षीय व्यक्ती, मालदाड रोड 46 व्यक्ती, 26 वर्षीय तरुण,जानकीनगर 65 वर्षीय व्यक्ती, यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच तालुक्यातील घुलेवाडी 71 व 59 वर्षीय व्यक्ती, 41 व्यक्ती, 34 वर्षीय तरुण, 26 वर्षीय तरुणी,13 वर्षीय बालिका, मनोली 58, 55 व 52 वर्षीय व्यक्ती, घारगाव 67 वर्षीय व्यक्ती, पिंपळे 55 वर्षीय व्यक्ती, वडगाव पान 32 वर्षीय महिला, 53 वर्षीय व्यक्ती, निमगाव टेंभी 60 वर्षीय व्यक्ती, निमगाव जाळी 56 व 55 वर्षीय व्यक्ती, हिवरगाव पठार 53 वर्षीय व्यक्ती, कासारा दुमाला 42 वर्षीय व्यक्ती, वनकुटे 48 वर्षीय व्यक्ती, 42 वर्षीय महिला, मिर्झापूर 10 वर्षीय बालक, पेमगिरी 33 वर्षीय महिला,
06 वर्षीय बालिका, देवकौठे 70 वर्षीय व्यक्ती, 34 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालक, आश्वी बुद्रुक 65 वर्षीय महिला 42 महिला, 18 वर्षीय तरुणी, ओझर खुर्द 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय व्यक्ती, जोर्वे 35 वर्षीय महिला, गुंजाळवाडी 20 वर्षीय तरुण, 10 वर्षीय बालक, समनापुर 55 वर्षीय व्यक्ती, साकुर 65 वर्षीय महिला, मालुंजे 55 वर्षीय महिला, 32 वर्षीय तरुण, निमोण 52 वर्षीय व्यक्ती, आंबी दुमाला 50 वर्षीय व्यक्ती, यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच संगमनेर 62 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला. तर एकूण 32 जणांचा मृत्यू झालेला आहे.