कृषी विज्ञान केंद्रात राष्ट्रीय पोषण अभियान निमित्त महिला मेळावा
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोविड १९ आजाराला रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक महिलांनी दैनंदिन आहारात पालेभाज्या व फळाचा वापर करुन सकस आहार घ्यावा, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केले. दहिगांव ने ता. शेवगांव येथील कृषी विज्ञान केंद्रात राष्ट्रीय पोषण अभियान निमित्त महिला मेळावा कोविड – १९च्या नियमाला अधीन राहून पार पडला. यावेळी राजश्री घुले प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले होते. घुले पुढे बोलताना म्हणाल्या की आरोग्यदायी जीवनासाठी संपूर्ण सकस पोषण आहार महत्वाचा आहे. यासाठी घराच्या जवळ मोकळ्या जागेत केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली पोषण परसबागेची लागवड करावी.
राष्टीय पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविका मतदनीस व महिला शेतकऱ्यांना परसबागेसाठी भाजीपाला बियाणे कीट, गांडूळखत व शेवगा रोपाचे प्रमुख मान्यवराच्या वितरण करण्यात आले. दैनंदिन जीवनातील आहारामध्ये जैव संपृक्त पिकाचे महत्व व पोषण थाळी या विषयावर डॉ. दिप्ती पाटगावकर विषय विशेषज्ञ – गृह विज्ञान, केव्हीके औरंगाबाद यांनी ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी इफको अहमदनगरचे प्रमुख व्यवस्थापक डी.बी. देसाई, महिला व बाल विकास प्रकल्प शेवगाव तालुका प्रमुख सोपान ढाकणे, आरोग्य अधिकारी डॉ.के. के. कानडे, दहीगाव-ने सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाउलबुद्धे, रांजणीच्या सरपंच मनीषा घुले ग्रामपंचायत सदस्य भारत घोडके, दादासाहेब नीळ केव्हीके दहिगाव-ने चे सर्व शास्त्रज्ञेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे व आभार राहुल पाटील यांनी मानले.
tadalafil generic – buy tadalafil buy tadalafil pills