प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी राजीनामा दिल्यानंतर तब्बल तीन महिने हे पद रिक्त होते. यासाठी नगरसेवकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर आज मतदान होऊन रखडलेल्या उपनगराध्यक्ष पदावर रमेश लाढाणे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे.
माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिने उलटले तरीही उपनगराध्यक्ष पदासाठी कोणीच काही बोलण्याचे चित्र दिसत नव्हते. अखेर श्रीगोंदा नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. त्यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी लवकर तारीख काढून निवड करण्यात येईल, असा शब्द दिल्यानंतर नगरसेवकांनी उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर प्रशासनाच्या हालचाली जोरात सुरु होऊन निवडीसाठी १७ सप्टेंबरची तारीख ठेवण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लॉबिंग झाली. तसेच अनेकांच्या मनधरणी करण्यात आल्या आणि अखेर आज मतदानाचा दिवस उजाडला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने रमेश लाढाणे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि नॅशनल काँगेसच्या आघाडीच्या वतीने निसार बेपारी यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माघारी घेण्याच्या वेळेत निसार बेपारी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दुपारी निकाल जाहीर केला. त्यात भारतीय जनता पार्टीचे रमेश लाढाणे यांना विजयी घोषित करण्यात आले.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. तसेच निवडीनंतर अनेकांनी उपनगराध्यक्ष लाढाणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही लाढाने यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
buy tadalafil 20mg price – buy real tadalafil online purchasing tadalafil online