Beed : जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ – धनंजय मुंडे

0
बीड जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामाची केली पाहणी
बीड जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या बांधकामाची आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून विविध सूचना दिल्या. यावेळी इमारत बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असेही मुंडे म्हणाले.
बीड जिल्हा परिषदेच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू असून पाचपैकी दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून सध्या तिथे फर्निचरचे काम सुरू आहे. तसेच वरील तीन मजल्यांचा आराखडा व अंदाजपत्रक राज्य शासनास पाठविण्यात आलेले आहे.
कोविडमुळे अनेक विकास कामांना सध्या निधी अभावी ब्रेक लागला असला तरी या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपण निधीची कमतरता भासू देणार नाही, असे म्हणताना मुंडे यांनी इमारतीची पाहणी करत असतानाच राज्य ग्रामविकास विभागाच्या सचिवांना दूरध्वनीवरून संपर्क साधत या टप्प्यातील निधीची तरतूद करण्याबाबत विनंती केली. मुंडेंनी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देऊ त्यानुसार तातडीने हे बांधकाम पूर्ण केले जावे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here