प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील कळमकर परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सहकार, राजकिय, सांस्कृतिक, आध्यात्मिक व कृषी क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असून ग्रामस्थांनी कळमकर परिवाराचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन कादवा साखर कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. के आर टी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे कर्मवीर एकनाथ मामा कळमकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सोमवंशी बोलत होते.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर यावर्षी सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर, विलास पाटील, प्रविण जाधव, पंढरीनाथ कळमकर, पुंडलिक कळमकर, शरद ढोकरे, नंदकुमार डिंगोरे, संतोष निकम, सुदाम पाटील, वसंत देशमुख, शांताराम संधान, शिवाजी नाठे, अनिल निकम, बबन जाधव, रविंद्र देशमुख, दौलत गणोरे, राजू कळमकर आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कर्मयोगी एकनाथ मामा कळमकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य विजय म्हस्के यांनी केले.
शालेय समितीचे अध्यक्ष विलास पाटील व माजी जिप सदस्य प्रविण जाधव यांनी कळमकर परिवाराच्या सामाजिक कार्याचा गौरव करत तालुक्यातील आदर्श असलेला हा परिवार समाजाच्या मदतीसाठी नेहमी अग्रेसर असल्याचे सांगितले. यावेळी विद्यालयातील पहिली ते बारावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरण समितीचे प्रमुख तुषार गिते यांनी बक्षीस वितरणाचे नियोजण केले. कार्यक्रमास अभिनवच्या मुख्याध्यापिका सोनाली देशमुख व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थ होते.