Newasa : सोनई येथील कौतुकी नदीला महापूर; लोकांच्या घरात पाणी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे तसेच सोनईच्या दक्षिणेला असलेले धनगरवाडी व मोरया चिंचोरे येथील तलाव ही अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने सोनई गावातील कौतुकी नदीने रौद्ररूप धारण केले.

गावातील शनि चौक, बँक कॉलोनी, मधुबन हॉटेल परिसर, दलीत वस्ती, वाहन बाजार, चांभार गल्ली, नवी पेठ, शिवाजी चौक, प्रशांत नगर, विवेकानंद चौक, बस स्थानक, माधव बाबा चौक, भाजी मंडई पुराच्या विळख्यात सापडल्याने गावातील बऱ्याच दुकानात व घरात पाणी शिरले आहे.

त्यामुळे व्यावसायिकांचे व रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सोनई पोलीस स्टेशनही पुराच्या विळख्यात सापडले असून मुख्यपेठेच्या वेशीपर्यंत पाणी आल्याने ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here