एलसीबीची कामगिरी
राहाता : येथील विरभद्र मंदिराच्या मूर्तीचे मुकूट पादुका व इतर दागिने असा जवळपास तीन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज अन्यात चोरट्याने मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून चोरट्याने चोरी केली.
या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे शिर्डीचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व एलसीबीचे अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून व मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली असता.
पोलीस पथकाने नांदूरी दुमाला ता संगमनेर येथे जाऊन तपास केला असता सदर गुन्हेगार हा प्रेमगिरीच्या डोंगरावर जाऊन जंगलात लपून बसला आहे, असे गुप्त बातमीदारांकडून समजतात. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून शोध मोहीम सुरू केली. तर त्या ठिकाणी भास्कर खेमजी पथवे वय – 42 वर्षे हा आरोपी आढळून आला. त्यांची चौकशी करून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीने चोरी केलेले सर्व साहित्य व मुद्देमालाच एका शेतामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. तर आरोपीने कोरठण खंडोबा मंदिर पारनेर येथून दोन महिन्यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल असून त्याच्यावर पारनेर संगमनेर नाशिक या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी यावेळी माहिती दिली. आरोपीला चोरी केलेल्या ठिकाणी आणण्यात आले होते. तर दुसऱ्या आरोपीचा कसून शोध सुरू असून आरोपीला पाच दिवसाच्या आत पकडल्याबद्दल वीरभद्र मंदिर व ग्रामस्थांच्या वतीने पोलिसचा सत्कार करण्यात आला.