प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी हभप गणेश महाराज डोंगरेअखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष हभप अनिल महाराज वाळके यांच्या शिफारशीने व राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचे पत्र हभप गणेश महाराज डोंगरे यांना देण्यात आले.
हभप गणेश महाराज डोंगरे यांचा जन्म आखेगाव येथील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी भगवान गडाचे महंत भीमसिंह महाराज यांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला. 2005 ते 2008 या वर्षामध्ये त्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आपला एक नंबर ने अभ्यास पूर्ण केला. श्रीमद्भगवद्गीता संपूर्ण मुखोद्गत करून कर्नाटक मधील शृंगेरी पिठाचे शंकराचार्य यांच्याकडून 21 हजाराचे पारितोषिक मिळवले.
अतिशय अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांनी वारकरी शिक्षण घेत असतानाच शालेय शिक्षणही बीए.बी.एड पदवीपर्यंत पूर्ण केले. त्यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी किर्तन बरोबरच ज्या मुलांना कोणाचा आधार नाही. त्यांना आधार देण्याचे काम महाराजांनी केले. आळंदीला जाऊन त्यांना शिक्षण घेता येणार नाही. अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना कुठेही न जाता महाराज आपल्या कीर्तनाच्या येणाऱ्या पैशातून सांभाळतात महाराज कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सक्रीय असतात म्हणूनच अखिल भारतीय वारकरी मंडळाने त्यांना या कार्याची दखल घेऊन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्त केले आहे.
महाराजांचे जिल्हाभरातून कीर्तनकार वारकरी संप्रदाय त्याचप्रमाणे सर्व मित्र मंडळ यांच्याकडून स्वागत होत आहे. आकाश पवार, चेअरमन रमेश जाधव, सरपंच विष्णुपंत घनवट, सरपंच बाबासाहेब गोरडे, सरपंच प्रदीप काळे, पै. संतोष जाधव, संतोष भुसारी, सुरेश लांडे, अजय मगर, प्रवीण भारस्कर, माऊली शिंदे, विकास शहाणे, पत्रकार रेवणनाथ नजन, सर्वांनी महाराजांच्या निवडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.