Shevgaon : राहत्या घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव : तालुक्यातील आखेगाव येथे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत नानाभाऊ शंकर कोल्हे, वय ७९ यांचा मृत्यू झाला आहे.

घर कोसळल्याचा आवाज होताच जवळपास राहणाऱ्या लोकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. दरम्यान, पोलीस पाटलांनी सदर घटनेची खबर शेवगाव पोलिसांना देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गावातील मंडळींनी खोरे, फावडे साहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नानाभाऊंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र लाकडी खांड, माती जास्त असल्याने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ढिगारा हटवावा लागला.

नानाभाऊ कोल्हे यांच्या पत्नी कौसाबाई व सून सीताबाई या शेळ्या बांधण्यासाठी बाहेर गेल्याने त्या दोघी थोडक्यात बचावलेल्या आहेत. दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने खणाच्या घराचे माळवद कोसळल्याचे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here