प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जामखेड तालुक्यातील मुंजेवाडी, येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात झालेल्यां, “नाबार्ड पुरस्कृत आणि कृषी विकास प्रतिष्ठाण, बारामती संचालित जवळा मुंजेवाडी एकात्मिक पाणलोट प्रकल्प” उद्घाटन सोहळयात सामाजिक सहभाग आधारित प्राथमिक टप्प्याला आज सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार रोहित पवार यांनी हा प्रकल्प जर गावातील लोकांनी पूर्ण ताकदीने राबवला तर ईतरही विकास कामात झुकते माप देणार, असे पवार यांनी सांगितले.
लोक सहभागातून हा पाणलोट प्रकल्प कसा यशस्वी होऊ शकतो. तसेच नाबार्ड राबवीत असलेल्या ग्रामीण अणि कृषी क्षेत्राशी निगडित काय काय योजना आहेत. त्यासंबंधी शीलकुमार जगताप, जिल्हा विकास अधिकारी यांनी विस्तृत माहीत दिली.
तसेच या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप अहमदनगर आत्माचे प्रकल्प संचालक अनिल गवळी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वालावलकर यांनी सुद्धा कृषी, कृषी प्रक्रीया अणि बॅंकिंग क्षेत्राशी निगडीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप गावकर्यांनी नाबार्ड पाणलोट विकासात सहभागाचे अनुमोदन दिले. तसेच, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे अणि मुंजेवाडीचे सरपंच बबन ठकाण यांनी आमदार रोहित पवार यांचे हा प्रकल्प जवळा-मुंजेवाडीतच होण्यासाठी सर्व तो परी प्रयत्न केल्या बदल आभार मानले.