Jamkhed : जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी आमदार रोहित पवारांचे प्रयत्न

0
स्पर्धेच्या तयारीसाठी विविध पदाधिकाऱ्यांसह समन्वय बैठक
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

देशांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा होत असून विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जामखेड शहराला पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळवून देण्यासाठी व जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी आमदार रोहित पवारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेच्या तयारीसाठी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच समन्वय बैठक घेण्यात आली होती. जामखेड शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, व्यापारी संघटना, सर्व ग्रामस्थांनी देशात जामखेड शहराची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी व स्वच्छ सर्वेक्षणात स्थान मिळवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले.

या स्पर्धेबाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गारबेज क्लिनचे संचालक प्रविण नायक, स्वच्छ सर्व्हेक्षण कॅन्सलटंट एबी फर्मचे भूषण देशमुख या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी भूषण देशमुख यांनी भारतात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची सविस्तर माहिती देत ‘कचरा मुक्त शहर’ ही मोहीम आगामी काळात राबविण्यात येणार असल्याचा संकल्प व्यक्त करताना जामखेड शहराला आदर्श मॉडेल करण्याचा विचार मांडला. यासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या उपक्रमांची व्हिडिओद्वारे माहिती दिली. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची नामांकने, याचे निकष व या स्पर्धेत घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

यासाठी ही लोक चळवळ झाली पाहिजे, असे मत आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले. पुढच्या काही दिवसात जामखेडचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी बोलताना सांगितले. यावेळी जामखेडचे नगराध्यक्ष नितीन घायतडक,मधुकर राळेभात,रमेश आजबे,तसेच सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here