वडाळा येथे ” माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” या मोहिमेचा कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
तसेच ही मोहीम एक लोक चळवळ असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, प्रशासकीय यंत्रणा व नागरिक यांनी एकत्र येऊन कोरोना आजाराचा विनाश करण्यासाठी या मोहिमेत सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर सर्व आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरजू बाधित ऑक्सिजनची व्यवस्था व बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिली पाहिजे. बेड, ऑक्सिजन पुरवठा व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध असून यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी वाढ करण्याची सूचनाही गडाख यांनी संबधितांना दिल्या. तसेच कोरोना विषयक प्रशासन करीत असलेल्या उपाय योजनांची संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.
कोरोना आजारापासून आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या योजनेत सर्व जनतेने सहभागी होऊन १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन शंकरराव गडाख यांनी केले.
tadalafil generic online – site generic tadalafil online