प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठ्या समस्या निर्माण झाल्या असून केंद्र सरकार आधीपासूनच शेतीला चालना देण्याऐवजी शेतकरी विरोधी धोरण राबवीत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यात अनेक दिवसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मार्केटला कांदा पाठवता आला नव्हता आता कुठे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला काढला असता,अचानक केंद्र सरकारने चुकीच्या धोरणातून कांदा निर्यातीवर बंदी घातली. कांद्याचे भाव गडगडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पाथर्डी तालुका यांच्या वतीने केंद्र शासनाच्या या चुकीच्या निर्णयाचा निषेध निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
यासंबंधी नायब तहसीलदार गुंजाळ साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवशंकर राजळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, नगरसेवक बंडू बोरुडे सिताराम बोरुडे, देवा पवार, नगरसेवक चाँद मणियार, आनंद पवार, शुभम वाघमारे, अकाश शिंदे, संदीप राजळे, शुभम वाघमारे हारुन मणियार आदि उपस्थित होते.
tadalafil dosage – tadalafil cost tadalafil professional