प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री
संगमनेरमध्ये दररोज कोरोना रुग्ण सापडण्याचे चक्र आजही सुरू राहिले असून बाधित रुग्ण संख्येत दररोज भर पडत आहे. आजही नवीन 50 बाधित रुग्ण सापडल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे संगमनेरकर काळजीत असून सर्वत्र भीतीदायक वातावरण पहावयास मिळत आहे. प्रशासन बाधित रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. परंतु उपलब्ध सुविधा काही प्रमाणात कमी पडत त्यात वाढ व्हावी, अशी अपेक्षा बाधित रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
आज शासकीय व खासगी प्रयोग शाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील 09 तर ग्रामीण भागातील 41असे 50 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. या वाढत्या रुग्ण संख्ये मुळे, संगमनेरने बाधितांचे 26 वे शतक ओलांडले असून आता रुग्णसंख्या 2638 वर पोहोचली आहे.
आजच्या अहवालात शहरातील 09 जणांचे अहवाल आले आहेत त्यात मालदाडरोड 50 वर्षीय व्यक्ती, 22 वर्षीय तरुणी,19 वर्षीय तरुण, महात्मा फुलेनगर 70 वर्षीय व्यक्ती, 63 वर्षीय महिला, गणेशनगर 58 वर्षीय व्यक्ती, मदिनानगर 41 वर्षीय व्यक्ती, रंगारगल्ली 50 वर्षीय महिला, 35 वर्षीय तरुण यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
आज ही तालुक्यातील बाधित रुग्ण संख्या 41 अशी मोठी प्राप्त झाली आहे. त्यात रहिमपूर 43 वर्षीय व्यक्ती, मंगळापूर 44 वर्षीय व्यक्ती, गुंजाळवाडी 50 वर्षीय व्यक्ती, 27 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा 55 वर्षीय व्यक्ती, घारगाव 54 वर्षीय महिला, 52 वर्षीय व्यक्ती, माळेगाव हवेली 50 वर्षीय व्यक्ती, पिंपळे 70 वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी 56, 54 व 52 वर्षीय व्यक्ती, कोठे बुद्रुक 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी, वनकुटे 58, 33 वर्षीय महिला 16, 10 व 10 वर्षीय बालिका, 60 वर्षीय व्यक्ती, 34 वर्षीय तरुण, 02 वर्षीय बालक, वेल्हाळे 19 वर्षीय तरुण, झोळे 85 वर्षीय व्यक्ती,
70 वर्षीय महिला, पानोडी 40 वर्षीय महिला, खळी 50 वर्षीय व्यक्ती, निमगाव पागा 62, 34 वर्षीय महिला, चिंचपूर 61 वर्षीय व्यक्ती, लोहारा, 35 वर्षीय महिला, देवकौठे 66, 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय व्यक्ती, तळेगाव दिघे 50 वर्षीय महिला, वडगाव पान 68, 51 वर्षीय व्यक्ती, रायतेवाडी 45 वर्षीय व्यक्ती यांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर संगमनेरची एकूण बाधित रुग्ण संख्या 50 ने वाढून थेट 26 वे शतक ओलांडून 2638 वर जाऊन पोहचली आहे. रुग्ण वाढ रोखण्यासाठी नागरिक व प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.