ये अंदर की बात है…शरद पवार हमारे साथ है – आमदार नितेश राणे

  1

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  कृषी विधेयंकावरून चालेल्या आंदोलनाविरुद्ध भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधूदूर्ग येथे पत्रकार परिषद घेत विरोधकांवर चौफेर फटके बाजी केली. यावेळी कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नाहीच, असा दावा करत ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, असं सूचक वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तर यावेळी काँग्रेस आणि शिवसेनावर देखील जोरदार टीका केली.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, फक्त त्यांनी सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश म्हणाले.

  खासदार संजय राऊत यांचे कृषी विधेयकावरील संसदेतील भाषण म्हणजे तळ्यात मळ्यात आहे. ना माहितीच नाही की त्यांच्या पक्षाला नेमकं जायचंय कुठं, किंबहुना शेती कुठे करतात आणि कशी करतात हे त्यांच्या नेतृत्वाला माहिती नाही. शेतीवर ते कधीही भूमिका घेत नाहीत.

  तर काँग्रेसबाबत बोलताना म्हणाले स्वतः राहुल गांधी यांनी 2013 मध्ये सत्तेत आलो तर बाजार समित्या रद्द करण्याचे विधान केले होते. तसेच त्यांच्या 2019 च्या जाहीरनाम्यात देखील हे आहे. मग विरोध कशाला फक्त विरोधाला विरोध करायला? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच दोन-चार राज्यांचा अपवाद वगळता अन्य सर्वत्र किसान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठाम उभा आहे, असेही ते म्हणाले.

  1 COMMENT

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here