Karjat : उपकारागृहातील २७ आरोपींना कोरोना, तालुक्याची एकूण रुग्णसंख्या @ ११६५

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २५

कर्जत तालुक्यात शुक्रवारी तब्बल ४७ व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असून यामध्ये कर्जत उपकारागृहातील २७ आरोपीचा समावेश असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. आजमितीस कर्जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची एकूण संख्या ११६५ झाली आहे. 
कर्जत तालुक्यातील शुक्रवार, (दि २५) एकूण ४७ व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. यामध्ये कर्जत शहर ७, मिरजगाव ५, निमगाव गांगर्डे २, कापरेवाडी १, बेळगाव १, कोभळी २, राशीन १ आणि माहिजळगाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. यासह कर्जत येथील उपकारागृहातील ४८ आरोपीची अँटीजन (रॅकद्वारे) चाचणी केली असता त्यामध्ये २७ आरोपीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे. तर २१ आरोपी निगेटिव्ह असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.
आजतागायत कर्जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची एकूण संख्या ११६५ झाली आहे. यामध्ये कर्जत शहरात २९६ तर ग्रामीण भागातील ८६९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये २० व्यक्तीचा उपचार घेत असताना कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवार अखेर १६५ रुग्ण ऍक्टिव्ह असून ११ व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here