संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आनंद

  1

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  खासदार संजय-राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. शिवसेना ज्या अर्थी काँग्रेससोबत युती करू शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते. या भेटीचा आनंदच आहे, असं सूचक विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

  राजकारणात काहीही होऊ शकते, हे शिवसेनेने काँग्रेस सोबत आघाडी करून दाखवून दिले आहे. मात्र, राऊतांच्या अशा एका भेटीने राजकारणात भूकंप येणार नाही. नी अनेकदा अशा अनेक भेटी घेतल्या आहेत. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणंही दिली आहेत. मात्र, फडणवीसांवर केलेल्या टिकेमुळे निर्माण झालेली कटूता कमी करण्यासाठी ही भेट घेतली असेन तर त्याचे स्वागतच आहे.

  भाजप नेहमी मूल्य आणि तत्त्वांना महत्त्व देणारा पक्ष आहे. त्यामुळे जनतेला जी भूमिका भावते तिच भूमिका भाजप घेत असतो, असंही ते म्हणाले. राऊत-फडणवीस भेटीवर मला भाष्य करता येणार नाही. कारण राऊत उद्या भेट झाल्याचा इन्कारही करतील. आम्ही आज फडणवीसांसोबत ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’त एकत्र होतो. त्याआधी ही भेट झाली असेल तर त्याची माहिती नाही, असंही ते म्हणाले.

  1 COMMENT

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here