प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या गुप्त भेटीत तब्बल तीन तास चर्चा सुरू होती. परिणामी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी मोठी चर्चा रंगली होती. मात्र, ती भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली होती, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
‘संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या मुलाखतीवर चर्चा करण्यासाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिट व्हावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळं एकदा भेटून मुलाखतीचे स्वरुप ठरवण्यासाठी ही भेट घेतली आहे. या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नाही,’ असं स्षष्टीकरण प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे.