बळीराजा राबराब राबतो दिवसरात्रीची तमा न बाळगता चांगले पीक येईल धनधान्यानी घर भरून जाईल या भांबडया आशेवर आसताना निसर्गचक्राच्या लहरीपणामुळे बळीराजाला हाताश निराश होण्याची वेळ चालु खरीप हंगामात आली आहे.गेल्या एक तपातील विक्रम यावर्षी पाऊसाने मोडुन काढला आसुन शेतकऱ्यांच्या तोंडातील घासही हिराऊन घेतला आसे म्हटले तरी वावगे ठरु नयेत कारण नुकसान झाले नुकसान भरपाईची मागणी केली जाते नुकसान भरपाई ही वेळोवेळी मागणी करून मिळते मात्र त्या तटपुंज्या नुकसान भरपाईच्या पाचपट नुकसान झालेले आसताना शेतकऱ्यांना नुसते तेल गेले तुप गेले हाती आले धोपाटणे आशी वेळ येत आहे.
गेल्या काही वर्षात पाऊसाचे प्रमाण अत्यंत नगण्य होते दर दोन तीन वर्षांनी दुष्काळ पिण्यासाठीच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत होती त्यावेळी दु्ःख होते पाउस वेळेवर पडत नाही हे दुःखच आता यावर्षी दुःख पाऊसामुळे पिके पाण्यात गेली दुःख हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे आशी परीस्थिती दिवसेंदिवस घडत आहे. भारत हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जात आसला तरी शेतकऱ्यांना ज्यावर्षी ज्या पिकांतुन चांगले उत्पादन झाले त्या मालाला केव्हाही योग्य दाम मिळत नाही आपल्या देशात ज्यावर्षी एखाद्या पिकांचे उत्पादन कमी मिळते त्यावेळी भाव भडकतात आजही शासन हमीभावा देत आसताना प्रतिवारीच्या कारणाने व्यापारीवर्गाकडुन हमीभावापेक्षाही कमी भावाने माल खरेदी केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावा आहे पण त्यापटीत मोबादला मिळत नाहीये.
चालु खरीप हंगामातील कापुस सोयाबीन तुर बाजरी यासारखी पिके पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे कपाशीचे बोंडे काळी पडुन सडु लागली आसुन सोयाबीला व बाजरीला उभ्या पिकांत क-हे फुटली आसुन तुर पिकांला जास्त पाण्याची गरज नसते अतिरिक्त पावसामुळे तुरचे डोक्याऐवढे वाढलेले पीक सुकुन गेले आहे आजुनही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आसल्याने किती नुकसान होणार की खरीप हंगाम पुरता वाया जाणार या विवचंनेत बळीराजा होळपळुन निघाला आहे