…..या देशात सापडलेला नाही एकही कोरोना रुग्ण

0

 
अर्जेंटिनापासून ते झिम्बाब्वेपर्यंत आणि व्हेटिकन सीटीपासून ते व्हाइट हाऊसपर्यंत सगळीकडेच करोनाचा रुग्ण आढळून येत आहे. करोनाचा संसर्ग हा प्रत्येक खंडामध्ये झाल्याचे आता उघड झालं आहे. जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये हजारोंच्या संख्येने करोनाचा रुग्ण आढळून आलेत. मात्र करोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्यापासून ११ महिन्यानंतरही जगातील काही देश असे आहेत जिथे अद्याप करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.   

यापैकी काही देशांमध्ये खरोखरच करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही तर काही देश करोनाचे आकडे लपवत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या ठिकाणांमध्ये पॅसिफिक महासागरामधील काही लहान बेटांवर वसलेल्या  देशांचा समावेश आहे.  टोंगा, किराबाती, सामोआ, माइक्रोनेशिया आणि तुलवालूसारख्या छोट्या आकाराच्या देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 
टोंगामधील चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या अध्यक्षा पाउला टाउमोइपियाउ यांनी मार्च महिन्यापासूनच आम्ही देशाच्या किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजांना दूर समुद्रातच थांबवण्याचे आदेश दिलेे असून विमानतळंही बंद करण्यात आल्याची माहिती दिली. करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नसतानाही सरकारने लॉकडाउन जारी करण्यात आलं होतं. जहाजांवरील सर्व लोकांची चाचणी केल्यानंतर त्यांच्या करोना चाचणीचे निकाल नकारात्मक आल्यानंतरच त्यांना देशात प्रवेश देण्यात आला, असंही पाउला म्हणाल्या.
टोंगाची एकूण लोकसंख्या अवघी एक लाख इतकी आहे. अंटार्टिकामध्ये मानवी वस्ती नसणारी काही बेटांवरही अद्याप करोना विषाणू आढळून आलेला नाही. या बेटांवर वेगवेगळ्या देशांमधील संशोधक येत असतात. मात्र करोनामुळे आता या बेटांवर येणाऱ्या संशोधकांची संख्याही कमी झाली आहे. 
कायमच चर्चेत असणाऱ्या उत्तर कोरियाने त्यांच्या देशात अद्याप करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं म्हटलं आहे. या देशाची एकूण लोकसंख्या दीड कोटी इतकी असून येथील हुकूमशाह किम जोंग उनने आपलं काम उत्तम असल्याचे दाखवण्यासाठी करोनाची आकडेवारी लपवल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही करत असलेल्या उपाययोजना हा आमचा राष्ट्रीय मुद्दा असल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट केलं आहे.
देशाच्या सीमांजवळील भागांमध्ये होणाऱ्या वाहतुकीसंदर्भातील नियम कठोर करणे, पर्यटकांवर बंदी घालणे, नागरिकांच्या चाचण्यांसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्चमार्यांची नियुक्ती करणे यासारख्या माध्यमातून आम्ही करोनावर नियंत्रण मिळवल्याचे उत्तर कोरियाकडून सांगण्यात येत आहे.सप्टेंबर महिन्यामध्ये उत्तर कोरियाच्या समुद्र किनाऱ्यावर आलेल्या एका दक्षिण कोरियन अधिकाऱ्याला गोळी घालून ठार करण्यात आलं.
करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जारी करण्यात आलेल्या नवीन आदेशांनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर सुमद्रावरीलच एका तरंगत्या प्लॅटफॉर्मवर ठेऊन मृतदेह जाळण्यात आला.उत्तर कोरियाप्रमाणेच तुर्कमेनिस्तानमध्येही एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही असा दावा तेथील सरकारने केला आहे. मात्र या दाव्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
६० लाख लोकसंख्या असणाऱ्या मध्य आशियामधील या देशातील अधिकारी येथील आरोग्यासंदर्भातील आकडेवारी लपवत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आम्ही कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही असं येथील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.  

जगातील कोणत्या देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही  पलाऊ, माइक्रोनेशिया, मार्शल बेटांचा समूह, नाउरू, किरिबाती, टोंगा, सामोआ आणि तुलवालू. जगभरातील करोना रुग्णांची संख्या पाच कोटींहून अधिक झा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here