मित्रानेच मित्राला दारू पाजून लुटले; दोघाविरोधात गुन्हा दाखल

0

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

जामखेड : दारू पिण्यासाठी घेऊन गेलेल्या मित्रालाच दुसऱ्या मित्राने इतर साथीदारांच्या मदतीने गंभीर जखमी करून सोन्याची चैन लुटल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणी घडला. या खर्डा घटनेत गंभीर जखमी झालेल्या मित्राने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला त्याच्या मित्रासह अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुभाष अर्जुन गोलेकर वय ५० वर्षे हा दि .२२ रोजी गोलेकर वस्तीवरुन खर्डा गावात कामानिमित्त आला होता. या वेळी आरोपी भगवान निवृत्ती जोरे हा त्याचा मित्र भेटला व त्याने सुभाष यास दारु पिण्यासाठी येण्याचा अग्रह धरला. त्यामुळे हे दोघे मित्र मोटारसायकलवरुन खर्डा ते भूम रोडवरील एका धाब्यावरून दारू घेतली व पुढील पटांगणात दारु पिण्यासाठी बसले.

यानंतर जोरे याने बाजुला जाऊन कोणाला तरी अज्ञात इसमास.फोन करुन त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात इसमाने यातील हातातील कसल्या तरी टनक वस्तूने फिर्यादी सुभाष गोलेकर याच्या डोक्यावर येथील मारून गंभीर जखमी केले. यानंतर जोरे याने त्याच्या छातीवर बसुन फिर्यादीची ८० हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकाऊन घटनास्थळाहुन पळ काढला.

फिर्यादी हा गंभीर जखमी झाल्याने दुसऱ्या दिवशी शुध्दीवर आल्यावर सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्या नुसार पोलिस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा यांच्या पथकाने जोरे यास ताब्यात घेतले असून आणखी दोघां विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. जोरे याला कोर्टात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली आहे. पुढील तपास एपीआय महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे.कॉ नवनाथ भीताडे , संजय लाटे , पो कॉ,शशी मस्के , पोकॉ.बाजीराव सानप व मनोज साखरे हे करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here