‘ट्रेडींग पॉवर’ पुस्तकांत फडणवीस  अजित पवार यांच्यातील पहाटेच्या शपथविधी सोहळ्या मागच्या संवादावर प्रकाश!

0

मुंबई :  वर्षभरापूर्वी धक्कादायक राजकीय खेळी करत महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या  अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीबाबत आतल्या गोष्टींवर प्रकाश टाकणारे पुस्तक ‘ट्रेडिंग पॉवर’ लेखिका प्रियम गांधी यांनी लिहीले आहे.

या पुस्तकात गांधी यांनी फडणवीस आणि पवार यांच्यातील संवाद जसेच्या तसे छापले आहेत. या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे  असून अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेण्यासाठी कसे तयार झाले? शरद पवारांचे मत काय होते? अजित पवारांनी त्यावेळी कोण कोणत्या आमदारांची नावे घेतली होती? इत्यादी तपशील या पुस्तकात आहे.

राष्ट्रवादीचा एक ज्येष्ठ नेता हा भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी शाह, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी एक बैठक महिन्याच्या सुरुवातीला पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचा एक बडा नेताही हजर होता. या बैठकीनंतरची ही गोष्ट. राष्ट्रवादीचा बडा नेता फडणवीसांच्या कार्यालयात गेला आणि ‘पवारांनी आपली भूमिका बदलली असल्याचे’ सांगितले ‘या टप्प्यावर पवारसाहेब भाजपला पाठिंबा देतील ही शक्यता फार धुसर आहे.

पवारांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचे वय झाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं हे अखेरचे पर्व आहे,’ असे हा बडा नेता फडणवीसांना सांगतो. ‘पवारांना आपली प्रतिष्ठा जपायची आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूकपूर्व राजकीय मित्राला दिलेला शब्द पाळला तरच पवारसाहेबांची प्रतिष्ठा टिकू शकते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर अशा सरकारला पाठिंबा द्यायला काँग्रेस पक्ष उत्सुक आहे.’

दुपारी वर्षा बंगला येथे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोनवर निरोप दिला

‘दादा, भाजप-राष्ट्रवादीच्या डीलला पवारसाहेबांचा पाठिंबा बहुधा मिळणार नाही असे दिसते. सगळीकडून आमच्या सूत्रांना हेच समजते. नेमकं काय चाललंय ?’अजित पवारांनी फडणवीसांना उत्तर पाठवले : ‘तुम्ही म्हणताहात ते खरे आहे. चित भी मेरी पट भी मेरा, असे पवारांचे धोरण दिसतंय. त्यांना वाटतंय की, सेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील. अशी संधी कोण बरे सोडेल ?’ ‘तुमची भूमिका काय आहे ?’ फडणवीसांनी अजित पवारांना विचारले. ‘अजूनपर्यंत मी भाजप आणि तुमच्याबरोबर आहे,’  असे अजित पवारांनी उत्तर दिले. त्यावर ‘तुम्ही पुरेसं संख्याबळ जमवू शकाल ?’ फडणवीसांनी विचारले तर ‘या घडीला माझ्याकडे २८ आमदार आहेत. मी जे म्हणेन ते ते करतील. तुमच्याकडे असलेले संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू,’ अजित पवार म्हणाले.फडणवीस यांनी त्यांना आमदारांची नावे विचारली तेंव्हा ‘सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील–शिवाय तेरा आणखी,’ अजित पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्याकडच्या आमदारांची यादी वाचून दाखवली इत्यादी तपशील या पुस्तकात दिला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here