रुग्णवाहिकेला भीषण अपघात; तीन जण जागीच ठार


सोलापूर : मृतदेह घेऊन जात असलेल्या एका रुग्णवाहिकेला   मालवाहतूक ट्रकने जोराची धडक दिल्याने  मोठा अपघात झाला आहे. पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जण जागीच ठार आहेत, तर दहाजण जखमी झाले आहेत. पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना रुग्णवाहिकेने एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. एका मृतदेहाला घेऊन ही रुग्णवाहिका निघाली होती.

पुण्यात रोजगारासाठी स्थायिक झालेल्या राठोड कुटुंबीयांतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतदेह हैदराबाद येथे मूळगावी नेताना शववाहिकेला अपघात होऊन त्यात एका महिलेसह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दहा जण जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरनजीक मोहोळ येथे शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये ३५ वर्षाच्या शववाहिका चालकाचाही समावेश असून त्याचे नाव समजू शकले नाही. रवी माणिक राठोड (वय ३८) व बुध्दीबाई चन्नापागूल (वय ४५) अशी अन्य दोघा मृतांची नावे आहेत. सोलापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर मोहोळ येथे शववाहिका समोरील एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार आदळली आणि हा अपघात घडला.

मूळचे हैदराबादजवळ राहणारे राठोड कुटुंबीय रोजगार तथा उदरनिर्वाहासाठी पुण्यात वारजे माळेवाडी येथे राहतात. त्यांच्या घरातील एका पुरूषाचा अचानकपणे मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यविधी मूळगावी उरकण्यासाठी मृतदेह शववाहिकेतून हैदराबादकडे नेण्यात येत होते. शववाहिकेत, मृतदेहाजवळ शोकाकूल राठोड कुटुंबीयांसह निकटचे काहीजण बसले होते. मध्यरात्री शववाहिका मृतदेह घेऊन पुण्याहून निघाली होती. पहाटे मोहोळजवळ आल्यानंतर समोरील एका वाहनाला शववाहिका अचानकपणे आदळली. शववाहिकाचालकाला पहाटे डुलकी लागल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. सर्व दहा जखमींना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळी पर्वातच हा अपघात झाल्याने मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली

5 COMMENTS

  1. Nice post. I learn something more challenging on different blogs everyday. It will always be stimulating to read content from other writers and practice a little something from their store. I’d prefer to use some with the content on my blog whether you don’t mind. Natually I’ll give you a link on your web blog. Thanks for sharing.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here