कोणतीही बँक सक्तीने कर्ज वसुली करणार नाही ; बाळासाहेब थोरात

संगमनेर : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षापासून शेतीत नुकसान सहन करावे लागत आहे . कधी दुष्काळ कधी गारपीट ,अतिवृष्टी इत्यादी बाबींमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.  अशा परिस्थितीत करोना विषाणूंमुळे देखील पिकलेल्या शेतीमालाला कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे. 

राज्य  व केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केल्यामुळे शेतीमालाला उत्पादना इतका दर मिळत नसल्यामुळे तोट्यात विकावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना फडणवीस सरकारने सुरू केली पण ती अटी व शर्ती लागू करून, त्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता आला नाही.  म्हणून गेल्या दहा वर्षापासून जशी परिस्थिती होती  तशीच परिस्थिती आजही शेतकऱ्यांची दिसून येते. याचाच परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

तसेच बँकेचे थकलेले कर्ज न भरल्यामुळे बँक सुद्धा सदरील शेतकऱ्यांवर  420 प्रमाणे गुन्हे दाखल करत  आहेत आणि विविध ठिकाणावरून कर्ज घेतल्यामुळे शेतकऱ्यांना सोसायट्यांचे सुद्धा कर्ज मिळणे अशक्य झाले आहे. या सगळ्या अडचणी आलेले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि त्याच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही. तेव्हा शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठल्याही कर्जमाफीचा लाभ न झालेल्या व सेवा सोसायटीचे कित्येक वर्षापासून थकित कर्ज असलेल्या राईट ऑफ न झालेले सातबारा उताऱ्यावर मालक सदरील  सोसायटीच्या नोंदी लागले आहेत.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या निवेदनासाठी शेतकऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घरासमोर चटणी-भाकरी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा त्यांची आहे. बाळासाहेब थोरात यावर बोलताना म्हणाले, सध्या करोना परिस्थितीमुळे राज्याची परिस्थिती सातबारा कोरा करणे इतकी सक्षम नाही परंतु पुढील दिवाळी पर्यंत आपण त्याच्यावर प्रयत्न करू. सध्या कोणतीही बँक सक्तीने शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करणार नाही असे आश्वासन त्यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here