Home Agriculture दोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

दोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

0


राहुरी –

तालुक्यातील कर्जमाफी पासून वंचित शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संजय मोकाटे व अमोल मोढे यांनी दिली.

भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्ज माफी योजना पासूनही तालुक्यातील सुमारे साडेआठशे शेतकरी वंचित राहिले आहेत.याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थेट भेट घेऊन याबाबत गाऱ्हाणे मांडणार आहे. दोन्ही योजनेच्या लाभापासून राहुरी तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत याचा विचार सरकारने करावा. अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here