भोर तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु ; वैद्यकिय अधिकारी डॉ. साबनेनी घेतली पहिली लस

0

भोर / प्रतिनिधी

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी तालुक्यात निश्चित केलेल्या एकशे तीस आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी पन्नास जणांनी प्रत्यक्ष लस घेतल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे यांनी दिली .

उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ .दत्तात्रय बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी डॉ .आनंद साबने यांना शनिवारी पहिली लस घेण्याचा मान मिळाला .

उपजिल्हा रूग्णालयातील ३१ आणि नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील १९ आरोग्य कर्मचाऱ्यांना यानंतर लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद साबने यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here