ब्राह्मणीतील निर्भयाचे कार्य गौरवास्पद -अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काळे

1

नगर : निर्भया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना निर्भय बनवून मानसिक आधार देण्याचे काम बानकर दाम्पत्य करत  असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे
यांनी केले.

अपर्णा बानकर संचलित निर्भया प्रतिष्ठानच्या स्त्री शक्ती गौरव कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. काळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आज महिलांना संरक्षण देणारे अनेक कायदे आहेत; मात्र भीतीने अनेक महिला त्रास होवूनही तक्रार करण्यास पुढे येत नाही, यामुळे सामाजिक विकृती वाढत आहे. अशा नीच विकृतींना जागेवर प्रत्युत्तर दिले गेले पाहिजे, सर्वच पुरूष वाइट नसतात आपण विरोध केला तर अनेकजण आपल्या मदतीला उभे राहतात, नवरात्री मध्ये केवळ साडीचे रंग महत्वाचे नसतात तर त्यावेळी कायद्याचाही अभ्यास करायला हवा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी परिसरातील कोरोना योद्धा, व्यावसायिक आणि आप आपल्या क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी निर्भया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अपर्णा बानकर, प्रसाद बानकर, मच्छिंद्र लांबे, प्राचार्याआश्विनी बानकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वाती हापसे व तेजस्वी भोसले यांनी केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here