कोणती प्रतिमा आहे ज्याचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा संबंध नाही.. जाणून घ्या नेमक प्रकरण …..

0

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मात्र, आता या प्रतिमेवरुन वादंग निर्माण झाला आहे. हे छायाचित्र नेताजी बोस यांचे नसून त्यांच्या चरित्रपटातील एका अभिनेत्याचे आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रतिमेतील व्यक्ती नेताजी नसून बंगाली अभिनेता प्रसनजीत चॅटर्जी असल्याचा दावा केला जात आहे. प्रसनजीत चॅटर्जी याने नेताजी सुभाषचंद्र यांच्या जीवनावर आधारित 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘गुमनामी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. राष्ट्रपती भवनात लावण्यात आलेले चित्र प्रसनजीत चॅटर्जी यांचा असल्याचे सांगितले जात आहे

 

केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती देशभरात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. यानिमित्ताने राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नेताजींच्या एका प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियावर या प्रतिमेविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी हा फोटो पद्मश्री पुरस्कार विजेते चित्रकार परेश मैती यांना दिला होता. या फोटोवरून परेश मैती यांनी नेताजींचे पोर्ट्रेट काढले होते. त्यामुळे या प्रतिमेचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा काहीही संबंध नाही. हा वाद निरर्थक आहे, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here