लोकप्रतिनिधींनी विकास कामांकडे लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी; हसन मुश्रीफ

0
नगर :
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील विकास कामांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. असा विश्वास पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्ह्यातील नेत्यांच नगर शहराकडे दुर्लक्ष होत आहे. आपले संस्थान मोठे करण्यात ते व्यस्त आहेत. असा खोचक टोला पालकमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना लगावला. प्रशासन व अधिकार्‍यांच्या मागे लागून कामे करून घ्या. जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. मी आज उपस्थित आहे. उद्या नसणार आहे. त्यामुळे सर्व आमदार अन्य लोकप्रतिनिधींनी आपल्या परिसरातील कामासाठी पाठपुरावा करावा. जिल्हा वार्षिक योजना साठी ६७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर व निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव ७३ कोटी रुपये एवढा निधी वितरित करता आला .
उर्वरित  शंभर टक्के खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.यंदा जिल्हा नियोजन समितीमार्फत पोलीस विभागास वाहन खरेदीसाठी १.७० कोटीची मंजुरी देण्यात आली आहे. चोरटे आता नवीन वाहन खरेदी करत आहेत. त्यामुळे त्यांचा पाठलाग करण्यासाठी आता पोलिसांना नवीन वाहने गरजेचे आहेत. असे पालकमंत्री म्हणताच एकच हशा पिकला. जिल्हा परिषद शाळेतील विद्युत रोहित्र,पोल इतरत्र हलवण्यासाठी  एकूण १२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. शाळा खोली बांधकाम यासाठी एकूण ३१ कोटी पर्यंत तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती मार्फत कोवि ड संदर्भात कामासाठी रुपये २४ कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्या अनुषंगाने अजूनही मागणी आल्यास उपलब्ध कार्यपद्धतीनुसार निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नगर शहरातील नाट्यगृह साठी साठी पाच कोटी रुपये इतकी मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी व विकास कामासाठी ९२ कोटी रुपये मंजूर केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न असून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून अकोले भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी निधी खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्र मान्यता देण्यात आली. यामध्ये नेवासा तालुक्यातील श्री महादेव मंदिर देवस्थान पानेगाव, श्री विठ्ठल रुक्मिणी अध्यात्मिक केंद्र गोनेगाव चौफुला, श्रीदत्त कृष्ण सिनाई देवस्थान ट्रस्ट भानसहिवरे, शेवगाव तालुक्यातील श्री भैरवनाथ ट्रस्ट अमरापुर, कोपरगाव तालुक्यातील श्री लक्ष्मी माता मंदिर देवस्थान कोकमठाण, नगर तालुक्यातील श्री तुळजाभवानी माता देवस्थान खादगाव टाकळी आदी तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here