नेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत शुभारंभ

0

 पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी पोलीस,खाजगी डॉक्टर,अंगणवाडी सेविका यांना लस 

नेवासा :

नेवासाफाटा येथे असलेल्या नेवासा ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी दि.२५ जानेवारी रोजी नेवासा तालुक्याचे युवा नेते उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी पोलीस,खाजगी डॉक्टर,अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांना लस देण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.यावेळी झालेल्या कोविशिल्ड लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी युवा नेते उदयन गडाख यांच्या समवेत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,गटविकास अधिकारी शेखर शेलार, मार्केट कमिटीचे सभापती कडूबाळ कर्डीले, नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मोहसीन बागवान, नेवासाफाटा येथील श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अविनाश काळे, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते.

यावेळी कोविशिल्ड लसीकरण कक्षाचे उदघाटन उदयन गडाख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.आरोग्य सेविका यांच्या हस्ते पहिली लस ग्रामिण रुग्णालयातील औषध निर्माता विकास बोपीनवार यांना आरोग्य सेविका प्रतिभा पाठक यांच्या हस्ते तर नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील तालुका समूह संघटक लताताई आहेर यांना आरोग्य सेविका शिलाताई सुखधान यांच्या हस्ते लस देण्यात आली.

यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी म्हणाले की मागील गेल्या एक वर्षांपासून आपण कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आहोत गेल्या वर्षी १९ मार्च रोजी कोविड चा पहिला रुग्ण नेवासा तालुक्यात सापडला होता त्यानंतर एक वर्षाच्या आतच शासन व प्रशासनाच्या प्रयत्नानंतर लस आली आहे ही आनंदाची बाब आहे.

पहिल्या टप्यात ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तसेच खाजगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांना लस दिली जाणार आहे त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस अधिकारी व पोलीस यांना लस देण्यात येईल मगच पन्नास वर्षे वयाच्या व्यक्तींना त्यानंतर इतरांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

यावेळी युवा नेते उदयन गडाख यांनी नेवासा तालुक्यात ही लस उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले यातून कुणीही वंचीत रहाणार नाही अशा सूचना ही त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या. पंचायत समितीचे सदस्यबाळासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. प्रतिनिधी सुधीर चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here